तब्बल 40 तास प्रयत्न करून समुद्रात सोडलेला बेबी व्हेल पुन्हा समुद्रकिनारी; किनाऱ्यावर मृत अवस्थेत सापडले
तब्बल 40 तास प्रयत्न करून समुद्रात सोडलेला बेबी व्हेल पुन्हा गणपतीपुळे समुद्रकिनारी परत आला परंतु तो मृत अवस्थेत सापडला आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे व्हेल माशाचं रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचं हे देशातील पहिलं रेस्क्यु ऑपरेशन ठरलं आहे.तब्बल 40 तास या ठिकाणी व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर रात्री उशिरा व्हेल माशाचं पिल्लु समुद्रात अनेक यंत्रणांच्या मदतीने सुखरूप गेले. मात्र, हा बेबी व्हेल पुन्हा एकदा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी मृत अवस्थेत आला आहे
मागच्या तीन दिवसांपासून बेबी वेलला खोल समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान बेबी वेलला समुद्रात सोडण्यास यश मिळाले. मात्र, आज, बुधवारी (15 नोव्हेंबर) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेबी व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी आला. बेबी व्हेलची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर या व्हेल माशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
www.konkantoday.com