एप्रिल-मेमहिन्यातील संभाव्यपाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी राजापूर पंचायत समितीतर्फेगावागावांमध्ये तब्बल १०५ बंधारे बांधण्यात आले
एप्रिल-मे
महिन्यातील संभाव्य
पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी राजापूर पंचायत समितीतर्फे लोकसहभागातून आतापासून वनराई बंधारे बांधून पाणीसाठा करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये विशेष उपक्रम म्हणून तालुक्यामध्ये एकाच दिवशी शंभरहून अधिक बंधारे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती करताना गावागावांमध्ये तब्बल १०५ बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला असून टंचाईच्या काळामध्ये तो उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी विवेक गुंड, सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायती. का लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ,
युवक आदींच्या सहभागातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत.
www.konkantoday.com