अजित पवार यांना देखील आता पश्चाताप होत आहे-ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत


महायुतीत गळचेपी होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विसर्जनानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी ही भेट झाली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.तसेच डिसेंबर महिन्यात महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे देखील विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान याबाबत बोलतांना विनायक राऊत म्हणाले की, “अजित पवार यांना देखील आता पश्चाताप होत आहे. त्यामुळे या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं, यासाठी ते विचार करत आहे. अजित दादा तसं स्पष्ट वक्ते आहे. त्यांच्या कार्यक्षमतेला खरं वाव देण्याचं काम मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र आता तशी परिस्थिती नाही. प्रत्येक विधानावरून आता अजित पवारांची गळचेपी होत आहे. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. तसेच शिंदे यांच्या विसर्जनानंतर आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी देखील अजित पवार यांनी केली असल्याचं,” विनायक राऊत म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button