सुप्रिया सुळे-अजितदादांनी साजरी केली भाऊबीज


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जात होता. परंतु दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील स्नेहभोजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केली आहे.सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.

अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सुप्रिया सुळेंसह सर्व बहिणी जमल्या होत्या. यावेळी सर्व बहिणींनी मिळून अजित पवारांना ओवाळलं, या क्षणी सर्वजण आनंदात दिसत होते. अजित पवारांसह त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनाही बहिणींनी ओवळलं. या क्षणाचे व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला पोस्ट केलेत. त्यामुळे भलेही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय दुरावा आला असला तरी कौटुंबिक जिव्हाळा आजही कायम असल्याचं पाहायला मिळते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button