सिंधुदुर्ग येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांची हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला रवाना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील मिलेश बांदकर हे प्रसिद्ध आंबा व्यापारी आहेत. त्यांना यावर्षीची पहिली सहा डझनाची हापुस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना करण्याचा बहुमान मिळवला आहे.वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेटीचे पूजन करण्यात आले.
देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध असून, हापुस आंब्याला जागतिक स्तरावर पोहचविणारे मिलेश बांदकर बंधूनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हापुस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठविली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहोर त्यांनी मेहनत करून वाचवला. या काळात पाऊस होऊन सुध्दा कोणतेही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत चार पेट्या आंबा अजूनही असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी येथे रवाना होणार असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com