सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय (75) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. रॉय भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.
www.konkantoday.com