
तब्बल ४२ तासाच्या अथक प्रयत्नातून गणपतीपुळे येथील किनारी आलेल्या व्हेल माशाला खोल समुद्रात सोडण्यात यश
तब्बल ४२ तासाच्या अथक प्रयत्नातून गणपतीपुळे येथील किनारी आलेल्या व्हेल माशाला खोल समुद्रात सोडण्यात यश आले आहे
गणपतीपुळेमध्ये सोमवारी सकाळी सात वाजता व्हेल जातीचा मासा समुद्राच्या किनारी आढळून आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने सदर माशाला आत मध्ये नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही
गणपतीपुळे समुद्रकिनारी सुमारे ३८ फूट लांब व तीन हजार टनाचा व्हेल मासा आढळून आला होता. सदरची बातमी गावातील गावाबाहेरील लोकांना समजल्यानंतर हा मासा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदरच्या माशाला तीन वेळा समुद्राच्या आत मध्ये नेऊन सोडलं गेला होता; सदरचा मासा तिने वेळेला बाहेर आला. समुद्रकिनारी आल्याने
सदर माशाच्या अंगामध्ये त्राण नसल्यामुळे माशावर उपचार करण्यासाठी पुणे येथून रेस्क्यू टीम बोलवण्यात आली. या टिमने सुमारे आठ सलाईन व तीन अँटिबायोटिक इंजेक्शन मारल्यानंतर सदरचा मासा हा तरतरीच झाला.
सायंकाळी भरतीची वेळ नसल्याने या माशावर पाणी टाकणे गरजेचे असल्याने MTDC कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून सदरच्या माशाला जिवंत ठेवण्यात आले.
पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने वनविभाग सदरच्या माशाला वेळीच योग्य ट्रीटमेंट दिल्याने सदरचा मासा हा जगू शकला व रात्री ११:३० वाजता जिंदाल पोर्ट च्या टगने व
कोस्टगाडै ची बोट त्याच्या साह्याने व्हेल माशाला खोल समुद्रात सुखरूप नेण्यात यश आले.
www.konkantoday.com