१७ नोव्हेंबर पासुन राज्यातील संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन


शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.मागण्या मान्य नझल्यास १७ नोव्हेंबर पासुन राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या.

सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक प्रमाणिकपणे करत आहेत, ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणकपपरिचालक अविरतपणे करत आहेत ग्रामपंचायतीचे ऑनलाईन व ऑफलाईन व इतर अनेक प्रकारचे कामे प्रामाणिकपणे करून सुद्धा केवळ ६९३० हजार रुपये हे या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन मिळते तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही. संगणकपरिचालक हे ग्रामपंचायत मध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणकपरिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे, त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन देण्याचे प्रमाण वाढले आहे,
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button