देवरुखात गांजाची अल्टो कारमधून अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या चौघांवर देवरूख पोलीसांची कारवाई


गांजाची अल्टो कारमधून अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या चौघांवर देवरूख पोलीसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई देवरूख -साखरपा मार्गावरील मार्लेश्वर तिठा येथे काल सोमवारी रात्री करण्यात आली.
या कारवाईत एकूण १ लाख ५४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
दिवाळीचा सण असल्याने देवरूख पोलीसांकडून नाक्या नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
मार्लेश्वर तिठा येथे काल सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना एका अल्टो कारची तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीसांनी चालकाकडे गाडीची कागदपत्रे मागितली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.
यावेळी पोलीसांना संशय आला. त्यांनी संपुर्ण गाडीची झडती घेतली असता गाडीत चौघेजण होते. व गाडीत तब्बल १ किलो ९०० ग्रँम वजनाचा गांजा मिळून आला.
पोलीसांनी गांजासहीत इक्बाल हनिफ खान (वय-२७, रा. देवरूख कांजिवरा), अजित उर्फ आऊ अनंत चव्हाण (वय-५४, देवरूख मच्छीमार्केट), संदीप गंगाराम भायजे (वय-४५, रा. देवरूख भायजेवाडी) व संदेश चंद्रकांत पाल्ये (वय-२७, रा. देवरूख कांगणेवाडी) या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क), २० (ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button