दापोलीचे आझाद मैदान बनलेय डंपिंग ग्राऊंड, रात्री बनतोय मद्यपींचा अड्डा


दापोली शहरामध्ये प्रशस्त असे आझाद मैदान आहे. मात्रहे मैदान आता नागरिकांसाठी चक्क डंपिंग ग्राऊंड झाल्याचेचित्र पहायला मिळत आहे. टाकावू वस्तूनी आझाद मैदान भरत असले तरी दापोली नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
दापोली शहरातील इमारतींचे तर काही ठिकाणी खोल्यांचे नुतनीकरण करण्यात येते, मात्र जुने, नादुरूस्त सामान, लाद्या आदी साहित्य मात्र आझाद मैदानावर आणून टाकले जात आहे. यामुळे  एस.टी.  बस स्थानकाच्या मागील बाजूस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मैदानाकडे प्रवेश केल्यानंतर कचर्‍याच्या ढिगाचे दर्शन होत आहे. शिवाय मैदानात वाढलेली झाडी यामुळे बिनधास्तपणे  लोक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. दापोली आझाद मैदानात रात्रीच्या सुमारास मद्यपी देखील बसलेले असतात. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button