तुम्हाला उर्फी जावेद, राखी सावंत, सनी लिओनी, क्रिकेट सामन्यांमध्ये नाचणाऱ्या चिअर्स गर्ल चालतात, पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी पाटील चालत नाही,-महिला ठाणे जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंदे
ठाण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेला शिंदे गटाच्या महिला ठाणे जिल्हाध्यक्ष मिनाक्षी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.तुम्हाला उर्फी जावेद, राखी सावंत, सनी लिओनी, क्रिकेट सामन्यांमध्ये नाचणाऱ्या चिअर्स गर्ल चालतात, पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी पाटील चालत नाही, अशा शब्दात मिनाक्षी शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘दोन बडे नेते बरळले आहेत, मला त्यांच्या बालबुद्धीची कीव येतेय. सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय. दिवाळी पहाटनिमित्त दिवाळी पहाटची व्याख्या काय आहे? त्यांना कळलं नाही का? कोणी ठरवलं हे मला माहिती नाही. लोककलेचा सन्मान ठाणेकर करत आहेत. कलाकारांचा आदर करणे हे ठाणेकरांची संस्कृती आहे , असे शिंदे म्हणाल्या.
‘गौतमी पाटीलने माझ्या स्टेजवर नृत्याचा कार्यक्रम सादर केला. मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यक्रमातील गर्दी बघून आव्हाड यांच्या पोटात दुखलं असेल, त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी खरंतर कलाकारांचा अपमान केला आहे. आम्ही मुंब्य्रात त्यांना पळून लावलं. तर सुषमा अंधारे यांच्या डोक्यात प्रकाश पडावा, दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेते, अशा शब्दात मिनाक्षी शिंदे यांनी टीका केली आहे.
www.konkantoday.com