गोवंश तस्करी करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल
गोवंश कतलीच्या उद्देशाने जनावरांना बांधून ठेवल्या प्रकरणी सौंदळ बागवेवाडी येथील तरबेज ठाकूर या संशयिताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याजवळ आढळलेली सुमारे १३ जनावरे गोशाळेत ठेवण्यात आली आहेत. तशी माहिती पोलिसांनी दिली.
शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता परटवली, सौंदळ येथील बागवेवाडी येथे तरबेज ठाकूर याने गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय आल्यानंतर येथील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व ओंकार मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना तरबेजवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी धाड टाकली असता संबंधित जागेवर १० बैल, १ गाय, १ गीर (पाडा) वासरू, १ गाय (पाडी छोटे) अशी एकूण १३ गावंशियांना चारा पायाची व्यवस्था न करताच त्यांच्या हत्येच्या हेतूने बांधून ठेवलेले आढळले.
त्याचप्रमाणे याच ठिकाणाहून पूर्वीही असेच गोवंश बांधून त्यांना हत्येसाठी पाठवली जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे तरबेज ठाकूर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि सर्व गोवंश ताब्यात घेवून गोवंशियांना गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले.
www.konkantoday.com