आयडॉल ऑफ रत्नागिरीपुरस्कारासाठी आवाहन
चिपळूण: मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्यावतीने विधवा महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती, विधवा महिला बचत गट, महिला मंडळ, सेवाभावी संस्था, समाजसेविका यांना आयडॉल ऑफ रत्नागिरी पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. हा मंच विधवा महिलांना विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात मानसन्मान मिळावा. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर नवा आदर्श निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या ज्या ग्रामपंचायतींनी या अनिष्ट विधवा प्रथेला मूठमाती देऊन विधवा महिलांचा सन्मान केलेला असेल, तसेच ज्यांनी विधवांना समान वागणूक देण्यासाठी प्रयत्न केले असतील किंवा करीत असतील अशांचा वरील पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरपूर्वी (९५११२७३३५५) या क्रमाकांवर संपर्क साधून यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांनी केले आहे. –
www.konkantoday.com