आम्ही पोलीस आहोत पुढे तपासणी सुरू आहे तुमच्याकडील दागिने आमच्याकडे द्या’-खेड मध्ये पोलीस असल्याची बतावणी करत २ लाखाला प्रौढास लुटले
आम्ही पोलीस आहोत पुढे तपासणी सुरू आहे तुमच्या कडील दागिने आमच्या कडे द्या ‘ अशी खोटी बतावणी करून खेड मधील प्रसिद्ध मंडप व्यावसायिकास दोघांनी २ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी महाडनाका परिसरात घडला.या प्रकारा नंतर ते चोरटे फरारी झाले.
राजा दळवी असे फसवणूक झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ते खेड मधील दळवी मंडप डेकोरेशन चे मालक आहेत. सोमवारी ते भरणे आपल्या दुचाकीने भरणे येथे जात असताना त्यांना महाड नाका गोळीबार मैदान येथे साध्या वेषातील दोघांनी अडवून ‘आम्ही पोलीस आहोत पुढे तपासणी सुरू आहे तुमच्याकडील दागिने आमच्याकडे द्या’ अशी खोटी बतावणी करत ते हातातील ब्रेसलेट सोनसाखळी काढून घेत एका पिशवी मध्ये टाकली आणि परत देताना दुसरी पिशवी त्यांना दिली. थोड्या वेळाने त्यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. आपण फसवले गेलो हे समजल्या नंतर त्यांनी थेट पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com