
अशी दंगल गाणी पहाटे वाजवणे तुमच्या संस्कृतीमध्ये बसतं का?शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारें
दिवाळी निमित्त रविवारी ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा जंगी दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला. शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनी या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा कार्यक्रम देखील ठेवला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी टीकास्त्र सोडलं आहे.दिवाळीमध्ये पहाटेची वाजवतात ती मंगलगाणी असतात तुम्ही ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी आहेत. अशी दंगल गाणी पहाटे वाजवणे तुमच्या संस्कृतीमध्ये बसतं का? असा खरमरीत सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
पुढे त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून शिंदे गटाला टोला लगावला आहे. यात त्यांनी म्हटलं की “ही संस्कृती तुम्हाला दिघे साहेबांनी शिकवली का? ही संस्कृती तुम्हाला बाळासाहेबांनी शिकवली का? दंगलगाणी वाजवून तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं.”गर्दी महाराष्ट्रात नळावरच्या भांडणालाही जमते. शिंदे गटाकडे वैचारिकांची नैतिक अधिष्ठा नाही हे प्रत्येकवेळेस सिद्ध होतं. पहाटे वाजवलेल्या दंगलगाण्यांमुळे अधिक स्पष्ट झालं इतकंच.”, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.लावणी, पोवाडा,भावगीत, भक्ती गीत, गजल, भूपाळी, भारुड, गोंधळ, अंगाई ही सगळी महाराष्ट्राची लोककला आहे. सगळ्याच गोष्टींबद्दलचा आम्हाला नितांत आदर आहे. परंतु एक उत्तम वाजंत्रीकार जो लग्नाचाही वाजवू शकतो आणि मढ्यातही वाजवू शकतो नियम असा आहे की मढ्याच्या ठिकाणी लग्नाच्या वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मढ्याचं वाजवू नये, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे.
www.konkantoday.com