कोकाकोलात पंधराशे कोटींची वाढीव गुंतवणूक-उद्योगमंत्री उदय सामंत
खेड तालुक्यातील अरिरिक्त लोटे औद्योगिक क्षेत्रात प्रस्तावित कोकाकोलाची गुंतवणूक ५६० कोटींची असून त्यामध्ये आणखी १५०० कोटींच विस्तारिकण होणार आहे. प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुे हजारो मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसाच्या शुभारंभानंतर पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, मी उद्योगमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात कोकाकोलाच्या माध्यमातून पहिलाच उद्योग येत आहे. ५६० कोटींच्या या प्रकल्पाने आणखी पंधराशे कोटींचे विस्तारिकण आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आम्ही रस्ता डागडुजीचे कामही हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या बाजूलाच रेल्वेचे कोच बनवणारा प्रकल्प असून मध्यंतरी थांबलेले या प्रकल्पाचे कामही आता सुरू झाले आहे. जिल्ह्या मँगो पार्क उभारण्याबाबत प्रयत्न सुरू असून वर्षभरात जिल्ह्यात असंख्य चांगले उद्योग येताना दिसणार आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. www.konkantoday.com