
वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या दूध संकलन केंद्रावर दूध संकलित करणाऱ्या ४ हजार १६७ शेतकऱ्यांना मार्चअखेर दूध संकलन बिलाच्या रक्कमेवर बोनस
चिपळूण येथे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कोकणात प्रथमच सुरू केलेल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या दूध संकलन केंद्रावर दूध संकलित करणाऱ्या ४ हजार १६७ शेतकऱ्यांना मार्चअखेर दूध संकलन बिलाच्या रक्कमेवर बोनस जाहीर केला आहे. तसेच सुरक्षा ठेव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात आली आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या प्रेरणेतून मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या प्रकल्पाची उद्योजक प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या प्रयत्नातून यशस्वी वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पाला शेतकरी व ग्राहकांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचे मालघर, आंबडस, पिंपळी, खेरशेत, दस्तुरी, वेरळ, साडवली, कराड, दापोली, करबुडे या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू झाली आहे. या केंद्राच्या पंचक्रोशीतील शेतकरी या दूध संकलन केंद्रावर दूध देत आहेत. शेतकऱ्यांना दुधाचे बिल दर १० दिवसांनी “शेतकऱ्यांना अदा केले जात असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
www.konkantoday.com