
रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर छोटा व्हेल मासा वाहुन आला
रत्नागिरी जवळील गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर छोटा व्हेल मासा सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी वाहुन आला आहे. सकाळी वाहुन आलेला छोटा व्हेल मासा जिवंत असुन त्याच्या बचावकार्यात काही अडथळे आहेत.साधन सामुग्रीची उपलब्धता कमी असल्यामुळे या माशाच्या बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
स्थानिकांनी बोटीच्या सहाय्याने रेस्क्यूचे प्रयत्न केले मात्र माशाच्या वजनामुळे त्याला अद्याप यश मिळालेले नाही. वनविभागाची टीम आणि स्थानिक काम करणारे लोक घटनास्थळी दाखल असुन विविध प्रकारे या माशाच्या रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, फिशरीज कॉलेजकडून एक ट्रॉली मागवण्यात आली असुन ती पोहोचताच पुढील बचावकार्य सुरू होईल, अशी माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. गणपतीपुळे येथील स्थानिक आणि वनविभागाच्या सहाय्याने हे बचावकार्य लवकरच पार पडेल अशी चिन्हे आहेत.
www.konkantoday.com