देवरुख येथील अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू


देवरूख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुचाकी अपघातात जखमी झालेल्या पूर वेलेवाडी येथील प्रौढाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे शनिवारी सकाळी मृत्यू झाला. अनंत मानका वेले (५३) असे मृत प्रौढाचे नाव प्रौढाचे नाव आहे.
अनंत वेले हे अपना बाजारमध्ये गेली अनेक वर्षे कामाला होते. चार दिवसांपूर्वी ते दुचाकीवरून प्रवास करत असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्य दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला होता. यामध्ये वेले यांना गंभीर दुखापत झाली होती. कोल्हापूर येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वेले हे मृत्यूशी झुंज देत होते. ही झुंज अखेर शनिवारी अयशस्वी झाली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button