चिपळूण सोने खरेदीसाठी २५ लाख रुपये घेतले मात्र व्यवहारापोटी ठरलेले सोने न देता दिलेले पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले,आरोपीविरुद्धचिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
चिपळूण सोने खरेदीसाठी २५ लाख रुपये दिल्यानंतर व्यवहारापोटी ठरलेले सोने न देता दिलेले पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. यातूनच एका सोने व्यावसायिकाची तब्बल २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघनाथ हाडा (मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. या बाबतची फिर्याद कृष्णेंदू मुकूल मोंडल (२८, सध्या चिपळूण, मूळ रा. पश्चिम बंगाल ) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णेंदू मोंडल व मेघनाथ हाडा हे सोन्याचे व्यापारी असून त्या
दोघांचे व्यावसायिक संबंध होते. या संबंधातून कृष्णेंदू मोंडल यांनी मेघनाथ हाडा याच्याकडून ५०० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ६ जून २०२२ ते १३ जुलै २०२३ या मुदतीत शहरातील खेराडे कॉ म्प्लेक्स येथील प्रवण गोल्ड नावाच्या सोने खरेदी-विक्रीच्या दुकानात त्याला रोखीने तसेच आरटीजीएस व एनईएफटीव्दारे एकूण २५ लाख पाठवले होते त्यानंतर सोने खरेदीचा व्यवसाय करण्यास
मेघनाथ हाडा हा टाळाटाळ करत होता कृष्णेंदू मोंडल यांच्या व्यवहारापोटी ठरलेले सोने तो देत नसून तसेच दिलेले २५ लाख रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप ठेवण्यात आला. हा प्रकार कृष्णेंदू मोंडल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस दिलेल्या फिर्यादीनुसार स्थानकात मेघनाथ हाडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com