सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतिय व्यवसायिकांविरोधात स्थानिक एकवटले;
सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरू केल्याने स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांच्या व्यवसायास फटका बसत आहे.मालवणातील स्थानिक व्यावसायिकांनी या विरोधात आवाज उठवत संबंधित परजिल्ह्यातील या व्यवसायिकांना मज्जाव करत यापुढे मालवणात जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसाय करू नये. व्यवसाय करताना आढळल्यास योग्य ते उत्तर दिले जाईल, असा आक्रमक इशारा दिला.
मालवणमधील बांधकाम संबंधित व्यवसायात कर्नाटक, विजापूर येथील कामगारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातीलच काही कामगारांनी आपल्या राज्यातील ट्रॅक्टर, जेसीबी व डंपर मालवणात आणून बांधकाम व इतर गोष्टीसाठी लागणारी सेवा देण्यास सुरुवात केली. ही सेवा देताना परप्रांतीय कामगार स्थानिक व्यवसायिकांपेक्षा कमी दर आकारत असल्याने स्थानिक व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
www.konkantoday.com