
रेल्वेखाली महिलेने संपवलं जीवन, कणकवलीतील घटना
कणकवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर मांडवी एक्स्प्रेस दाखल होत असताना एका महिलेने रुळावर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.११ नोव्हेंबर) दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली.माधवी मधुकर पाटणकर (वय ६९, रा. चिंदर, पालकरवाडी) असे महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर मांडवी एक्स्प्रेस अर्धा तास स्थानकात खोळंबली होती.
मडगाव ते ‘सीएसएमटी’कडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस कणकवली स्थानकात ११.४८ च्या सुमारास दाखल झाली. ही एक्स्प्रेस येण्याआधी दहा मिनिटे गाडी स्थानकात येण्याची उद्घोषणा झाली. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या माधवी पाटणकर या प्लॅटफॉर्म सुरू होत असलेल्या दिशेने रवाना झाल्या होत्या. मांडवी एक्स्प्रेस एक नंबरच्या प्लॅटफार्मवर येत असताना अचानक त्यांनी गाडीच्या इंजिनखाली झोकून दिले. यात त्या जागीच ठार झाल्या.रेल्वे सुरक्षा बल आणि कणकवली पोलिस कर्मचाऱ्यांनी रुळावरील मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. माधवी या आपले पती मधुकर यांच्यासमवेत चिंदर येथे राहत होत्या. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही; मात्र सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com