फुसका बार वाजलाच नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
काल दिवाळी सुरू झाली, फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्य्राच्या दौऱ्यादरम्यान सरकारवर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले. काल दिवाळी सूरू झाली, फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
www.konkantoday.com