निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्धची सुनावणी लांबणीवर


निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला दिले होते. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेची सुनावणी आता १५ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या याचिकेवर सुनावणीसाठी २० नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. एकीकडे शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरण ३१ डिसेंबर पर्यंत निकाली काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. मात्र शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव याबद्दलची सुनावणी ही लांबणीवर गेली आहे.

नाताळच्या सुट्ट्यांआधी न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस १५ डिसेंबर असतो. १६ डिसेंबर पासून नाताळच्या सुट्ट्या असतात, त्यामुळे या सुनावणीबद्दलचा निर्णय आता थेट २०२४ या वर्षातच होईल अशी शक्यता आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ही याचिका उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button