
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची हक्काची : उदय सामंत
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे.त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
आपले मोठे बंधू किरण ऊर्फ भैया सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा असून आग्रहही आहे. त्यांनी लोकसभेत जावे, असे मलाही वाटत आहे; परंतु निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली, तर तिही शिवसेनेमधूनच असेल, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
कोणी या मतदारसंघावर दावा केला तरी शिंदे-फडणवीस-पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com