बेकायदेशीर मासेमारी विरुद्ध सहायक मत्स्य विभागाची जोरदार मोहिम आखत या हंगामात २७ नौकांवर कारवाई
रत्नागिरी:- बेकायदेशीर मासेमारी विरुद्ध सहायक मत्स्य विभागाने जोरदार मोहिम आखत या हंगामात २७ नौकांवर कारवाई केली. यातील सात प्रकरणे निकाली काढली असून त्याच्याकडुन १४ लाखचा दंड वसूल केला. यामध्ये ७ पर्ससिन नौका, ३ एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका, २ टॉलर व अन्य नौकांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी (ता.) अभय शिंदे यांनी दिली.
१ महाराष्ट्राच्या जलदीक्षेत्रामध्ये बेकायदेशीर मासेमरी रोखण्यासाठी मत्स्य विभाग कायम तयार असतो. परंतु या विभागाला स्वतःची गस्ती नौका नसल्याने त्यांना भाड्याची नौका घेऊन बेकायदेशीर मासेमारीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करावा लागतो. जिल्ह्याती सुमारे पावणे तीनशे पर्ससिन नौका आहेत. छोट्या मोठया नौका धरून ही संख्या अडिच हजाराच्या दरम्यान आहे. मिनी पर्ससिनचीही संख्या मोठी आहे. या मासेमारीला कोणतीही परवानगी नसताना राजरोस ही मासेमारी सुरू आहे. तर पर्ससिन मासेमारीला १२ वावाच्या बाहेर मासेमारी करण्यास राज्याच्याचा नियम सांगतो. परंतु त्याचेही पालन होत नाही. बंदी असलेल्या एलईडीचाहा वापर करून मासेमारी होताना दिसत आहे.
www.konkantoday.com