
तारकर्लीच्या समुद्रात महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी तारकर्ली समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तीन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलेलं असून एक जण बेपत्ता आहे.कोल्हापूरच्या मुरगूड महाविद्यालयातील विद्यार्थी सहलीसाठी तारकर्ली समुद्रावर गेले होते. काही विद्यार्थी समुद्रात बुडाल्यानंतर त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. तीन विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं असून एक जण मात्र बेपत्ता आहे. वाचवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com