
चक्रीवादळामध्ये बाधित झालेल्या दापोली व मंडणगड तालुक्यातील दिव्यांगांना मदत मिळणार
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या एक कोटी निधीपैकी ७५ लाख रुपये निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित झालेल्या दापोली व मंडणगड तालुक्यातील दिव्यांगांना समप्रमाणात देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दापोली दौऱ्यात केली.
दापोली नगरपंचायत सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत त्यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती घेतली तसेच पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली
www.konkantoday.com