संसदेच्या हिवाळी अधिवेशनास ४ डिसेंबरपासून सुरुवात; गुन्हेविषयक नव्या कायद्यांच्या मसुद्यांवर चर्चेची शक्यता

0
29

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरला सुरू होऊन ते २२ डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. अधिवेशन काळात १९ दिवसांत १५ सत्रे होतील, असे जोशी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे सांगितले. ‘अमृतकाळात कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्दय़ांवर चर्चा होण्याची प्रतीक्षा आहे’, असे ते म्हणाले.
आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स अ‍ॅक्ट यांच्याऐवजी नवे कायदे करण्याचा प्रस्ताव असलेली तीन विधेयके अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. गृहविषयक स्थायी समितीने हे तिन्ही अहवाल यापूर्वीच स्वीकारले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here