
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे पौष्टिक लाडू, फळांचे वाटप.
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात लाडू, फळवाटप करण्यात आले. तसेच देहदान व नेत्रदानाचे अर्ज भरून देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, महासचिव सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विकास कुमरे यांची भेट घेण्यात आली.
त्यावेळी गौतम गमरे यांनी देहदान व नेत्रदानाचा आणि सिद्धार्थ कांबळे यांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला.त्या नंतर लहान मुलांच्या कक्षामध्ये सर्व मुलांना केळी व सफरचंद वाटप आणि कुपोषित कक्षातील मुलांसाठी २१ दिवस पुरतील एवढे पौष्टिक लाडू वितरित करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, डॉ. आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष एल. व्ही. पवार, युवा अध्यक्ष समीर जाधव, महिला जिल्हाध्यक्ष विरश्री बेटकर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, वंचित आघाडीचे सचिव राकेश कांबळे, रत्नदिप कांबळे, शांताराम कदम आदी उपस्थित होते.