सैतवडे सरपंचपदी साशिद शेकासन बिनविरोध निवड
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावचे सुपुत्र, राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक साजिद लियाकत शेकासन यांची बुधवारी पुढील अडीच वर्षासाठी सैतवडे सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
उद्योजक साजिद शेकासन हे वाटद विभागात उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक भैया सामंत, अण्णा सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिंदे गटाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. जिल्हा प्रशासनावरील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत असलेले सलोख्याचे संबंध सैतवडे गावच्या विकासासाठी उपयोगात येतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. सरपंचपदी नेमणूक झाल्यानंतर साजिद शेकासन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावातील सर्व घटकांतील नागरिक, सदस्य सर्वांना सोबत घेवून गावच्या विकासासाठी समर्थक काम करू असे सांगितले.
www.konkantoday.com