मुद्रांक खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे नियम-राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन

. मुद्रांक खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे नियम लागू केलेले आहेत. त्यात सुसुत्रता आणली पाहिजे. तसेच प्रतिज्ञापत्रासाठीही असलेल्या काही अटी लोकांना अडचणीच्या ठरत आहेत, त्या रद्द कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केली आहे. म्हणाले, जिल्हास्तरावर एक नियम आणि तालुक्यात वेगवेगळे नियम आहेत. याचा प्रत्यय अनेक वेळा येत आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत नागरिकांच्या हिताचा विचार करावा. एकीकडे सरकार नागरिकांना सुटसुटीत सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापरही करण्यात येत आहे. मुद्रांक खरेदीसाठी स्वतः उपस्थित राहणे आणि स्वाक्षरीची अट सक्तीची आहे. त्यामुळे नागरिकांना १०० रुपयांच्या मुद्रांक खरेदीसाठी ५०० रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आर्थिक भुर्दडाबरोबर वेळही वाया जातो.काही तालुक्यात मुद्रांक खरेदी करीत अन्य लोकांना मुद्रांक देण्यात येते. त्यामुळे एका जिल्ह्यात वेगवेगळे नियम का असा प्रश्न पडतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button