रत्नागिरी नजिकच्या अलावा येथे कॉन्ट्रॅक्टर असलेल्या मित्राला हॉकी स्टीकने बेदम मारहाण, चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी नजिकच्या अलावा येथे कॉन्ट्रॅक्टर असलेल्या मित्राला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० या सुमारास घडली. सचिन मधुकर वाडकर (३९, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. सचिन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
मानस कीर (३०, रा. अभ्युदयनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सचिन वाडकर व मानस कीर हे मित्र आहेत. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. सचिन वाडकर, मानस कीर व अन्य तिघेजण झाडगांव एमआयडीसी येथील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिऊन झाल्याने पाचही जण एका स्वीफ्ट गाडीत बसले. गाडी अलावा दत्त मंदिर येथे आणून कीर व अन्य तिघांनी वाडकर याला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली.
www.konkantoday.com