
दिवाळीच्या तोंडावर खासगी ट्रॅव्हल वाल्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट;
दिवाळी तोंडावर आल्याने बाजारात खरेदीची झुंबड उडाली आहे. तसे बाहेरगावी घराकडे जाण्याचे चाकरमणी आणि माहेरवाशिनींना वेध लागले आहेत. मुलांना शाळेला सुट्या लागल्यापासून प्रवासासाठी निघालेल्यांची गर्दी वाढली.नेमका याच गर्दीचा गैरफायदा घेत काही खासगी वाहनधारकांनी आर्थिक लूट सुरू केल्याच्या तक्रारी आहेत.
एरवीपेक्षा अवाच्या सव्वा दरात भाडे आकारणी होत असल्याने ग्राहकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.
पुणे- मुंबईसह बाहेर राज्यातील शहरात जाण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत
www.konkantoday.com