दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी निलिमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या ताब्यातील लॅपटॉप जप्त
दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी निलिमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून लॅपटॉप जप्त केला. या लॅपटॉपमधील माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. निलिमा हिच्या कामाची स्थिती व तिच्यावर कशा प्रकारचा कामाचा दबाव होता, या संबंधी माहिती या लॅपटॉपमध्ये असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
निलिमा हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार निलिमा चव्हाण हिच्यावर कामाचा दबाव होता. तसेच तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी संशयित आरोपी संग्राम सुनील गायकवाड (रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा देत होता. यातूनच आपल्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार निलिमा चव्हाण हिच्या वडिलांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी संग्राम गायकवाड याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यात असलेला लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आला. या लॅपटॉमध्ये निलिा हिच्या कामासंदर्भातील माहिती असल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com