दापोलीतील मुरूड येथील साई रिसॉर्ट पाडण्यास न्यायालयाची परवानगी, शिवसेना नेते अनिल परब यांना मोठा धक्का
ट्रायल कोर्टाचा आदेश बाजूला ठेवत खेड येथील जिल्हा न्यायालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील मुरूड येथील साई रिसॉर्ट पाडण्यास शनिवारी परवानगी दिली. हा शिवसेना नेते व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
अनिल परब यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट नंतर राजकारणी मित्र सदानंद कदम यांना विकले. विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट तोडण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला विद्यमान मालक कदम यांनी ट्रायल कोर्टात आव्हान दिले होते. ज्याने खटल्याचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकार्यांना रिसॉर्ट पाडण्यास मनाई केली होती. जिल्हाधिकार्यांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. आपल्या आदेशात जिल्हा न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी असे निरीक्षण नोंदवले की, करण्यात आलेले बांधकाम मंजूर आराखड्यापेक्षा जास्त आहे. मंजूर केलेल्या परवानगीमध्ये असे नमूद केले आहे की सीआरझेडच्या पहिल्या २०० मीटरच्या आत कोतीही विकास कामे केली जाणार नाहीत. न्यायमूर्तीनी पुढे निरीक्षण केले की जर बांधकाम न्यायालयाच्या हातून संरक्षित असेल तर ते न्यायालयाच्या हातून बेकायदेशीरतेचे संरक्षण असेल.
www.konkantoday.com