जुनी पेन्शन योजना लागू करा व अन्य मागण्यांसाठी जि.प. कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण रद्द करा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेचे कर्मचारी बुधवारी मोर्चाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या मोर्चाद्वारे केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय न घेतल्यास १४ डिसेंबर २०२३ पासून पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा रत्नागिरी बुधवारी माझे कुटुंब माझी पेन्शन सहकुटुंब महामोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करून निश्‍चित लाभाची जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरणाबाबतचे सर्व शासन निर्णय रद्द कराव अन्य प्रलंबित महत्वाच्या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत बेमुदत संप केला जाणार आहे. आक्रोश मोर्चाची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच लाभ निश्‍चित करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन अभ्यास समितीची स्थापना केली. या समितीला शासनाकडून १४ जून २०२३ पर्यंत ३ महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु या बाबीला आजमितीस ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही या समितीचा अहवाल गुलदस्त्यातच आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button