जिल्ह्यातील एमआयडीसीमधील १४३ उद्योग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील सात औद्योगिक वसातींमधील उद्योगांचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सर्व्हे सुरू आहे. जिल्ह्यात वाटप झालेल्या १ हजार ६४७ भूखंडातील उद्योगांपैकी ३३४ उद्योगांचा सर्व्हे झाला आहे. यामध्ये १९१ उद्योग सुरू असून १४३ उद्योग बंद झाल्याचे सर्व्हेमध्ये निदर्शनास आले आहे. यामध्ये रत्नागिरीतील झाडगांव, मिरजोळे तसेच दापोली, लोटे एमआयडीसीतील सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे बंद उद्योगांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने ही बाब चिंतेची आहे. जवळजवळ पन्नास टक्के उद्योग बंद असल्याचे गंभीर चित्र आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यात रत्नागिरी, झाडगांव, मिरजोळे, लोटे, गाणे खडपोली, खेर्डी या औद्योगिक वसाहती आहेत. www.konkantoday.com