कल्याणात दीड हजार दिव्यांच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्याण करांनी तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे.यंदाच्या दिवाळीची सुरुवात कल्याणकरांसाठी अत्यंत भारावलेली अशी झाल्याचे दिसून आले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे. यावेळी तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती ही या दिपोत्सवाची केंद्रबिंदू आणि विशेष आकर्षण ठरली.
या दिपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले.
www.konkantoday.com