उदय सामंत फाउंडेशन यांच्या मार्फत रत्नागिरीत भव्य इंद्रधनु रंगावली प्रदर्शन 2023


रत्नागिरीतील होतकरू व गुणवंत कलाकारांना पुन्हा रत्नागिरीकरांमध्ये चैतन्य फुलवायची.. आणि रत्नागिरीकरांना “उदय सामंत फाउंडेशन” च्या माध्यमाने आणि माननीय मंत्रीसाहेब उदयजी सामंत यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने पुन्हा एकदा तीच सुंदर दिवाळी रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवायची संधी मिळणार आहे
आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उदय सामंत फाडंडेशनचे काम सुरूच आहे पण यांसोबतच दि. 14 नोव्हेंबर पासून सुरू होणा-या “ इंद्रधनु ” च्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून रत्नागिरीच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा हातभार उदय सामंत फाउंडेशन यांच्या मार्फत नक्कीच होणार आहे..
जागतिक किर्तीचे रांगोळीकार श्री. राहूल कळंबटे यांच्या समवेत मुंबई,पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, इस्लामपूर याठिकाणचे जागतिक दर्जाचे रांगोळी कलाकार निखील कांबळे, समिधा रसाळ, कुणाल किर, अजय पारकर, कौस्तुभ सुतार, गुरूप्रसाद देवघरकर, प्रविण वेळणस्कर, विलास रहाटे, रोहित कोकरे, अक्षय वहाळकर, तेजस गोसावी, केदार टेमकर, सचिन अवसरे, अभिजीत सूर्यवंशी, विशाल चौघुले, विकास नांदिवडेकर, योगेश पाटील, पंकज पाटील हे रांगोळीकार या प्रदर्शनात आपली कला सादर करणार असून जवळपास 5 दिवस हे सर्व कलाकार रांगोळी काढण्यासाठी काम करणार आहेत. त्यानंतर हे प्रदर्शन दि. *14 नोव्हेंबर 2023 पासून 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व रत्नागिरीकरांना बघण्यासाठी दामले विद्यालय, रत्नागिरी येथे सर्वांसाठी *विनामुल्य* खुले असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये आपल्याला 3 D रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, सामाजिक विषय, रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळे अशा विविध प्रकारच्या *35 विलोभनीय कलाकृती पहायला मिळणार आहेत.
*इंद्रधनु रांगोळी प्रदर्शाचे उद्घाटन 14 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 4.00 वा. दामले हायस्कूल येथे रत्नागिरीतील जुने सुप्रसिद्ध रांगोळीकार प्रभा पिलणकर, कृष्णा जाधव यांच्या शुभहस्ते तसेच प्रशांत राजिवले, राजू भाताडे, प्रविण कांबळे, संतोष साळवी, प्रशांत पवार, राजू वाघाटे या रत्नागिरीतील जुन्या नामांकित रांगोळीकारांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
*उदय सामंत फाउंडेशन
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button