उच्च न्यायालयातील निर्णय इंग्रजी भाषेतून मराठी, कोंकणी आणि गुजराती भाषेत भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू
उच्च न्यायालयातील निर्णय इंग्रजी भाषेतून मराठी, कोंकणी आणि गुजराती भाषेत भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने इंग्रजीतील न्यायालयीन निर्णय स्थानिक भाषेत भाषांतरित केले जात आहेत.महाराष्ट्राची राजभाषा मराठी, गोवाची राजभाषा कोंकणीमध्ये न्यायालयीन निर्णय उपलब्ध राहतील. गुजराती भाषेतही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे भाषांतर केले जाईल.
२०२० साली सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन निर्णय स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू केले होते. इंग्रजी भाषेतून देशातील नऊ प्रमुख भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील निर्णय भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुवास सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाषांतराचे कार्य करण्यात आले. याच धर्तीवर आता मुंबई उच्च न्यायालयातही एआयच्या मदतीने न्यायालयीन निर्णयांचे तीन भाषेत भाषांतर केले जात आहे.
www.konkantoday.com