
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे मालपवाडी येेथे भूसुरूंगाचे काम रोखले
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे मालपवाडी येेथे मिर्या नागपूर महामार्गाच्या कामानिमित्त भूसुरूंग लावण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. आणि ८ ते १० फुटाचे भूसुरूंग लावण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांना व आरोग्य यांना धोका होवू शकतो. त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी हे भूसुरूंगाचे काम शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते बापू शिंदे यांनी सोमवारी रोखले.
या भूसुरूंगाच्या स्फोटामुळे येथे असलेल्या घरांना व दाभोळे ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे त्याला तडे जावून नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आजुबाजूच्या शेतजमिनींना भविष्यात भेगा पडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com