राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ गावामध्ये ४ बिबट्यांचा वावर
राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ गावामध्ये गेली सहा महिने बिबट्याचा मुक्त संचार चालू असताना वनविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सद्यस्थितीत रात्री ९ वा. दरम्यान चार चार बिबटे गावामध्ये एकत्र फिरत असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा सप्रे यांनी दिली. परिणामी गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
हसोळ येथे उन्हाळ्यामध्ये लाकूड व्यापारी सुदर्शन केळवळकर, श्री. रोग्ये यांची जनावरे मारली होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रथम संतोष केळवळकर यांची पाडी व चार दिवसांनी बाळकृष्ण परवडी यांच्या दिवसा ढवळ्या चार बकर्या पकडल्याची घटना घडली होती. यावेळी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. मात्र वनविभागाने तेथे जावून सरकारी पंचनामा केला. मात्र पुढे काही नाही.
www.konkantoday.com