रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्य
रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. संदीप शांताराम सागवेकर (४१, रा. धामापूर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्र्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी दुचाकी चालक सुरज रामचंद्र झेपले (रा. खेडशी, रत्नागिरी) याच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री सुरज झेपले आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ एई-१५६३) चालवत वेगाने जात होता. तो खेडशी येथील मंदिराजवळ आला असता त्या ठिकाणी रस्ता ओलांडणार्या संदीप सागवेकर यांना त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात संदीप यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी संदीप यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनी संदीपला तपासून मृत घोषित केले. या बाबत ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
www.konkantoday.com