
रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथेस्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई मध्ये मिळाली, लाखो रुपये किमतीची “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस), चार आरोपी ताब्यात
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते मिऱ्या बंदर जाणाऱ्या रोडच्या बाजूला, चंपक मैदान रत्नागिरी येथे (काही व्यक्ति लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) ची विक्री करिता येणार आहेत) अशी गुप्त बातमी मिळाल्या नुसार लागलीच स्था. गु. शा. येथील सहा. पो. निरीक्षक श्री. अमोल गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एक पथक तयार केले व या पथकासह चंपक मैदान जवळ सापळा रचला गेला.
चंपक मैदान येथून 4 इसमांना संशयित रित्या जाताना या पथकाने थांबविले व लागलीच त्यांची झडती घेता, त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” मिळून आली.
या कारवाई मध्ये, खालील नमूद 4 पर जिल्ह्यातील इसमांना,
1) विकास अनंत मेस्त्री, वय-४८ वर्षे, रा. जामसंडे, तरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
2) समिर विठ्ठल तेली, वय – ३९ वर्षे, रा. मु.पो. बगाडवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग,
3) राजेश मोतीराम जगताप, वय – ३४ वर्षे, रा. साईनाथवाडी देवगड, जि. सिंधुदुर्ग व
4) महेश मनोहर ठुकरुल, वय – ४८ वर्षे, रा. टाटा पॉवर श्रीकृपा चाळ कमिटी, रुम नं. १२ देवीपाडा, बोरीवली, (पूर्व),मुंबई नं. ६६, मूळ रा. जामसंडे, मळी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
आपसात संगनमत करून, लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना आपले ताब्यात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले असताना मिळून आले म्हणून त्यांचे वर वन्य जीव(संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम 39,44,48,49(ब), 57 व 51 प्रमाणे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 208/2023 अन्वये गुन्हा नोंद करून, मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध घेण्याकरिता अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) सपोनि, श्री. अमोल गोरे, स्था.गु.शा, रत्नागिरी,
2) स.पो.फौ/65 प्रशांत बोरकर, सुरक्षा शाखा, रत्नागिरी,
3) पो.हवा /1188 सुभाष भागणे
4) पो.हवा /799 विनोद कदम
5) पो.हवा/ 909 विजय आंबेकर
6) पो.हवा /135 सागर साळवी
7) पो.हवा/1410 सत्यजित दरेकर व
8) चालक पो. ना/1532 श्री. दत्ता कांबळे.
www.konkantoday.com