पडवीत ठेवलेली लाकडे तसेच जुने वासी यांची चिता पेटवून वृद्धाची आत्महत्या ,लांजा तालुक्यातील पालू पांदले खालची वाडी येथील घटना
घराशेजारी असलेल्या पडवीत लाकडे आणि जुने वासे यांची चिता तयार करून त्यात स्वतः आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील पालू पांदले खालची वाडी येथे बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्यच्या सुमारास घडली आहे .या घटनेने गावात खळबळ उडाली असली तरी मानसिक संतुलन बिघडण्याच्या कारणातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पालू पांदले खालचीवाडी येथील शंकर सखाराम सपकाळ (वय ७०) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. वयोवृद्ध झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच अवस्थेत आज आठ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या पडवीत ठेवलेली लाकडे तसेच जुने वासी यांची चिता पेटवून त्यात आत्महत्या केल्याने पूर्ण शरीर जळून भस्मसात झाले.
www.konkantoday.com