दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेला संशयित मागील दोन वर्षापासून फरार
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येेथे दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेला संशयित मागील दोन वर्षापासून फरार झाला आहे. राजेंद्र अडीअप्पा गंटेनेवर (रा. जाकादेवी, ता. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. कोरोना काळात राजेंद्रला न्यायालयाकडून तात्पुरत्या काळासाठी बाहेर सोडले होते. याचाच फायदा घेत राजेंद्र बेपत्ता झाला असून पोलिसांकडून २ वर्षापासून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
२०१९ मध्ये राजेंद्र याने पत्नी उज्ज्वला गंटेनेवर (४०, रा. जाकादेवी, ता. रत्नागिरी) हिचा खून केला होता. तिची मुलगी करिष्मा हिने या घटनेची खबर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. उज्ज्वला यांचा मृतेह मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. उज्ज्वला यांच्या हातावर, डोक्यावर व मानेवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचा आरोप राजेंद्रवर ठेवण्यात आला.
www.konkantoday.com