दापोली बसस्थानकात बसच्या धडकेने ६८ वर्षीय वृद्ध जखमी
दापोली बसस्थानकात बसने धडक दिल्याने चरण जाधव हे ६८ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
चरण जाधव आरोग्य तपासणीसाठी दापोली येथील डॉ. पटवर्धन यांच्या रूग्णालयात गेले होते. तेथून ते परतताना दापोली बसस्थानकात आले. यावेळी मिरज ते दापोली बसचालक सतीश जाधव (३१, ताडगाव, उस्मानाबाद) यांना अंदाज न आल्याने त्यांनी जाधव यांना ठोकर दिली. यामुळे जाधव यांच्या डाव्या बाजूला दुखापत झाली असून दापोली पोलीस स्थानकाचे हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.
www.konkantoday.com