चिपळूण शहरातील शिवनदी व अन्य भागातील अडचणीच्या जलवाहिन्या हलवणार
चिपळूण शहरातील शिवनदी व अन्य भागात असलेल्या अडचणींच्या जलवाहिन्या हलवण्यात येणार आहेत. सध्या शिवनदीतील जलवाहिनी पुलावरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येवू नये म्हणून नगर परिषद ही खबरदारी घेत आहे.
नगर परिषदेची जलवाहिनी अनेक वर्षांची आहे. त्यामुळे काही भागात शिवनदीतून रस्त्याखालून तर काही ठिकाणी गटारातून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही वर्षापूर्वी करोडो रुपये खर्चून करण्यात आलेल्या पाणी योजनेत या जलवाहिन्या बदलल्या जातील असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तसे न होता या योजनेत अनेकांनी हात धुवून घेत योजना वादग्रस्त बनवली. मात्र याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. कधी पावसाळ्यात नदीतील पाईप वाहून जात असून अनेकदा गटारातून असलेल्या जलवाहिनीमधून येणार्या पाण्यातून किडे येण्याचे प्रकार घडत आहेत.
www.konkantoday.com