कै. डॉ. विवेक पनवेलकर यांचे नाव पशु चिकित्सलाय मधील एका कक्षाला देण्यात यावे.., भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांची मागणी..
डॉ. विवेक विलास पनवेलकर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी रत्नागिरी ग्रामीण भागातील सर्व पशु पालक शेतकऱ्यांना अगदी समर्पित भावनेने सेवा दिली आहे.
विशेष म्हणजे स्वतः अधिकारी असूनही त्यांनी ग्रामीण भागात जाऊन नुसती पुस्तकी पंडिताप्रमाणे उपदेश न देता त्यांनी शारीरिक मदत केली आहे. त्यांनी स्वतः वेळ काळ न बघता पशु पालक शेतकऱ्यांना केलेली मदत ही अमूल्य आहे त्याची तुलनाच करता येणार नाही.
म्हणून डॉ विवेक पनवेलकर यांचे नाव चंपक मैदानात बांधण्यात येणाऱ्या पशु चिकित्सलाय च्या त्यातील एका कक्षाला नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी भाजप चे रत्नागिरी दक्षिण तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदना द्वारे केली आहे. या सोबत ग्रामीण भागातील अनेक ग्रामीण पशुपालक शेतकऱ्यांच्या सह्या देखील करण्यात आल्या आहेत.
ही मागणी करण्यासाठी तालुका अध्यक्ष रत्नागिरी दक्षित यांचे सोबत तालुका अध्यक्ष रत्नागिरी उत्तर विवेक सुर्वे, तालुका उपाध्यक्ष दिलीप काका पटवर्धन , तालुका सरचिटणीस उमेश देसाई, अभय लाकडे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com